खबरदार गड-किल्ल्यांवर मद्य सेवन कराल तर...

| मुंबई | दि.०5 ऑक्टोबर २०२४ | राज्यातील गड-किल्ल्यांवर होणारे मद्य सेवन हा नेहमीच चिंतेचा विषय आहे. त्यामुळे गड किल्ल्यांच्या नावलौकिकास बाधा पोहचते. तसेन अनेक ठिकाणी गड किल्ल्यावर दारूचे सेवन तसेच ड्रग्जचे सेवन करण्याच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र आता गड-किल्ल्यांवर दारू आणि ड्रग्ज सेवन करणे महागात पडणार आहे. 

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

कारण राज्य सरकारने गड किल्ल्यांवर दारू तसेच ड्रग्जचे सेवन केल्यास दोन वर्षांच्या शिक्षेसह एक लाख रूपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकांचा व निर्णयांचा धडाकाच सुरू आहे. 

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

गेल्या ४ दिवसांत तब्बल ७८ शासन निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. त्यात, शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ४१ विषयांना कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली. त्यामध्ये, गोड्या पाण्यातील मच्छिमारांसाठी तसेच सागरी मच्छिमारांसाठी महामंडळ स्थापन केले जाणार आहे. 

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

तर, महत्वाचा निर्णय म्हणजे, गड किल्ल्यांची सुरक्षा व संवर्धन हा आहे. गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्ज घेतल्यास यापुढे २ वर्षांची शिक्षा व १ लाख रुपयांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तसेच, राज्य सरकारने आज ४१ निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post