वेशा व्यवसायावर छापा; पिटा कायदयांतर्गत गुन्हा दाखल

वेशा व्यवसायावर छापा; पिटा कायदयांतर्गत गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हे शाखा व राहुरी पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई
 

| अहिल्यानगर | दि.20 ऑक्टोबर 2024 | राहुरीत हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावरर स्थानिक गुन्हे शाखा व राहुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या प्रकरणी विक्रम सुरेश विशनानी (वय 27, रा.तनपुरेवाडी, ता.राहुरी) व फराद अहमद सय्यद (वय 38, रा.राहुरी) यांच्यावर पिटा कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 18 रोजी राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पोसई तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत न्यु भरत हॉटेल राहुरी येथे एक इसम महिलांकरवी कुंटणखाना चालवित आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाने सदरची माहिती राहुरीचे पोनि संजय ठेंगे यांना दिली.

त्यानंतर तपास पथक व पोनि संजय ठेंग पोलीस अंमलदार एकनाथ आव्हाड, विकास साळवे,जालिंदर साखरे अशांचे संयुक्त पथक तयार करून छापा टाकला असता विक्रम सुरेश विशनानी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये 3 महिला मिळून आल्या. महिलांकडे विचारपूस करता त्यांनी ग्राहकांकडून पैसे घेऊन आमचेकडून वेश्याव्यवसाय करून घेतात. वेश्याव्यवसायातून मिळणार्‍या पैशावर आमची उपजीविका चालते, अशी माहिती दिली. या तीन महिलांची सुटका करण्यात आली.

या प्रकरणी विक्रम सुरेश विशनानी व फराद अहमद सय्यद या दोघांवर राहुरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा (पिटा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मपोकॉ सारीका नारायण दरेकर यांनी फिर्याद दिली. या कारवाईत पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोसई तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप दरंदले, संतोष खैरे, विशाल तनपुरे, सारीका दरेकर तसेच रणजीत जाधव आदींच्या पथकाने सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post