नगर-मनमाड रोडवरील अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

| अहिल्यानगर | दि.11 ऑक्टोबर 2024 |राहुरी फॅटरीपरिसरात नगर मनमाड महामार्गावर सेल पेट्रोल पंपसमोर एकेरी वाहतूक सुरू असल्या कारणाने अल्टो कार व माल वाहतूक ट्रक चा सामोरा समोर भीषण अपघात झाल्याने ममदापूर तालुका राहता येथील पती पत्नी जागीच ठार झाले.महामार्ग धिम्या गतीने सुरु असलेली दुरुस्तीमुळे पुन्हा एकदा या मार्गाने पती पत्नीचा बळी घेतला आहे. 

👉जिल्ह्यात मूग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी 

ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिर्डीकडून नगर कडे दीपक गोविंद म्हसे व माया दीपक म्हसे मेहुण्याच्या दशक्रियाविधीसाठी जात असताना अल्टो कार एमएच १४ ऐव्ही ३३७२ ला नगरकडून शिर्डी कडे जात असणार्‍या माल वाहतूक ट्रक केऐ ०१ ऐएन ५६९७ ने समोरून जोराची धडक दिली असता अल्टो कार मधील दीपक गोविंद म्हसे व माया दीपक म्हसे दोघेही राहणार ममदापूर तालुका राहता हे दोघेही पती पत्नी जागीच ठार झाले आहेत. 

👉रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा 

दरम्यान घटनास्थळी परिसरातील तरुण मंडळींनी तातडीने मदतकार्य केले. तर रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.

👉येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

 

Post a Comment

Previous Post Next Post