ज्योती मेटेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश


। मुंबई । दि.20 ऑक्टोबर 2024। विधानसभेचे वारे वाहत असतानाच आता पक्षप्रवेशांनाही वेग आला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचे चित्र आहे. यातच आता शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दिवंगत नेते विनायक मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत चर्चा केली होती. आता विधानसभेवेळी त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला असून त्यांना बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

यावेळी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार जयंतराव पाटील, आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ज्योतीताई विनायकराव मेटे यांच्यासह सलीम पटेल व बाळासाहेब खोसे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला आहे. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार शशिकांत शिंदे, हे देखील उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post