डॉ चैताली गोरे यांची आकाशवाणी "हॅलो डॉक्टर" या कार्यक्रमात मुलाखत


| अहिल्यानगर | दि.12 ऑक्टोबर 2024 | गोरे डेंटल हॉस्पिटल, माळीवाडा च्या संचालिका व  दंतशल्यचिकित्सक डॉ चैताली गोरे यांची आकाशवाणी वरील" हॅलो डॉक्टर "या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात मुलाखत बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.या मुलाखतीचा विषय "लहान मुलांच्या दातांच्या समस्या व त्यावरील उपचार" हा या मुलाखतीचा विषय आहे. 
 
ही मुलाखत लाईव्ह घेण्यात येण्यात येणार असून प्रसरणाची वेळ बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री९ ते १० या वेळेत होणार आहे. तरी रुग्णांनी आपल्या शंका व प्रश्न (०२४१) २४२ ३४ ७१ किंवा २४२ ३६ ७२ या दूरध्वनी क्रमांकावर विचाराव्यात असे आवाहन गोरे डेंटल हॉस्पिटल माळीवाडा यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
 
 
डॉ चैताली सुदर्शन गोरे या एम.डी.एस असून मागील पंधरा वर्षापासून अहमदनगर शहरांमध्ये दंतवैद्यकीय सुविधा पुरवत आहे . लहान मुलांमध्ये बदललेल्या आहारामुळे दातांच्या समस्या वरील  उपचार व घ्यावयाची काळजी याच्या संदर्भात डॉ चैताली गोरे या मार्गदर्शन करण्यात करणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post