नगर शहराची जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी पक्ष आग्रही : आ. इंद्रविजय गोहिल

नगर शहराची जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी पक्ष आग्रही : आ. इंद्रविजय गोहिल

राष्ट्रीय काँग्रेसच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांनी साधला शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद

| अहिल्यानगर | दि.11 ऑक्टोबर 2024 | राज्यामध्ये आपली महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्षांची समिती मिळून जागा वाटपावर चर्चा राज्यस्तरावर करत आहे. नगर शहरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद चांगली आहे. जनसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते पक्षाकडे आहेत. लोकांना त्यांच्या प्रश्नांवर लढणारे नेतृत्व नेहमी हवे असते. शहराची विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाकडे घेण्यासाठी पक्ष आग्रही आहे. कार्यकर्त्यांनी बूथ लेवल पर्यंत यंत्रणा सज्ज ठेवावी. कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होऊ शकते. कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत रहावे, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे गुजरातचे आ. इंद्रविजय गोहिल यांनी केले आहे.

शुक्रवारी सकाळी शासकीय विश्रामगृह येथे आ. गोहिल यांनी शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदाची जबाबदारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भातील शहर विधानसभा मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रशांत दरेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष मोसिम शेख, पदाधिकारी बाळासाहेब भंडारी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना चुडीवाला म्हणाले की, शहरात ताबेमारी, गुंडगिरी, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. बाजारपेठ संकटात आहे. विकास कामे रखडलेली आहेत. मतदारांमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधिं बद्दल मोठी नाराजी आहे. त्याच वेळी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये काँग्रेसचे मजबूत संघटन उभे असून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये बूथ लेवल पर्यंत कार्यकर्त्यांची फळी पक्षाने उभी केली आहे. काळे यांच्यासारखा उच्चशिक्षित, तरुण आणि निर्भीड असा सक्षम चेहरा पक्षाकडे आहे. त्यामुळे कोणत्या ही परिस्थितीत ही जागा काँग्रेसकडे घेत काळेंना उमेदवारी देण्याची आग्रही मागणी यावेळी आ. गोहिल यांच्याकडे करण्यात आली.

पोलखोल मोहिमेमुळे सत्ताधाऱ्यांना घाम फुटला : यावेळी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसने विश्वास जुना, आम्हीच पुन्हा या सत्ताधाऱ्यांच्या दाव्याच्या सुरू केलेल्या पोलखोल मोहिमेमुळे सत्ताधाऱ्यांना घाम फुटला असल्याचे शहरातील कार्यकर्त्यांनी निरीक्षक आ. गोहिल यांना सांगितले. काळे यांच्या या मोहिमेचे आ. गोहिल यांनी कौतुक केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निश्चित येणार आहे. त्यामुळे सक्षम विरोधक म्हणून जनसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत शहरात काँग्रेस राबवत असलेली पोलखोल मोहीम महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी निर्णायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Post a Comment

Previous Post Next Post