लोणावळ्यातून स्वीफ्ट डिझायर चोरणार्‍यास नगरमध्ये बेड्या!


| अहमदनगर | दि.05 ऑक्टोबर 2024 | लोणावळ्यातील स्वीफ्ट डिझायर कार चोरी करणार्‍याला जेरबंद करण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. तुषार बाळासाहेब कोल्हे (रा. नागेेशर गल्ली, पारनेर, जिल्हा अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील स्टेट बँक चौकात पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे.

👉महिलांच्या सुरक्षेसाठी पंचशक्ती अभियान 

लोणावळा शहर पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी रात्रीच्या सुमारास फिर्यादी शरीफा शेख यांची स्वीफ्ट डिझायर कार (एमएच-१४-एचयू-१७७१) ही लोणवळा बाजारपेठ येथे रेल्वे पार्कीगमध्ये पार्क केली असता, अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. 

👉गजाच्या सहाय्याने दरवाजा उघडून चोरट्यांन... 

सदर घटनेबात कॅम्प पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरक्षक जगदिश मुलगीर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकातील अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाव्दारे तपास करुन सदर गुन्ह्यातील स्वीफ्ट डिझायर कार व आरोपी तुषार कोल्हे यास स्टेट बँक चौकातून जाताना थांबवले असता, तो पळून जाण्याच्या तयारीत असताना शिताफीने ताब्यात घेतले आहे.

👉हिंदी लघुकथा लेखन स्पर्धेत वृषाली हिवाळे... 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोहेकॉ संदिप घोडके, दीपक शिंदे, अभिजित आरकल, रवि टकले, अजय गव्हाणे, पो.कॉ. अमोल आव्हाड, काळे, झिने कांतीलाल चव्हाण, यांनी केली आहे.

👉 मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता... प्राचीन, ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास... 

Post a Comment

Previous Post Next Post