महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले... तारीख ठरली

| नवी दिल्ली | मुंबई | दि.15 ऑक्टोबर 2024 | संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं असून, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आता महाराष्ट्राच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज (मंगळवारी) राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार पडतील.

तर 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. 288 जागांसाठी निवडणुका पार पडतील. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. दिवाळीनंतर निवडणुका होणार हे आता निश्तिच झाले आहे.

👉मनसे स्वबळावर लढणार निवडणूक : राज ठाकरे

👉अजित पवार गटाचे बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार! 

👉'नगर दक्षिण' मधील विविध विकास कामांसाठी साडेपाच कोटींचा निधी मंजूर

Post a Comment

Previous Post Next Post