कोतकर समर्थकांमध्ये जल्लोष

कोतकर समर्थकांमध्ये जल्लोष 

संदीप कोतकर यांची जिल्हाबंदी शिथील

 

| अहिल्यानगर | दि.17 ऑक्टोबर 2024 | माजी महापौर संदीप कोतकर यांना आज न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोतकर यांची नगर जिल्हा बंदीची अट न्यायलयाने शिथील केली आहे. या निर्णयाची माहिती मिळताच कोतकर समर्थकांनी केडगावमध्ये मोठा जल्लोष केला.

माजी महापौर संदीप कोतकर हे नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोतकर यांचा नगर जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, नगर शहरात आल्यानंतर संदीप कोतकर हे काय राजकीय भूमिका मांडतात, याकडे आता विरोधकांचे लक्ष लागले आहे. 

👉अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा विजयादशमी समारंभ

👉हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय वणवास संपला ; पाटलांनी तुतारी फुंकली

Post a Comment

Previous Post Next Post