कौस्तुभ काळे यांचे चालण्याच्या स्पर्धेत सुयश


| अहिल्यानगर | दि.12 ऑक्टोबर 2024 | अहिल्यानगरचा रहिवासी असलेला कौस्तुभ पांडुरंग काळे यांने सलग दोन वर्ष तालुका स्तरीय चालण्याच्या स्पर्धेमध्ये यश मिळवून तालुक्याचे नाव जिल्हा पातळीवर नेले आहे. सन 2023 व 2024 या सालात कौस्तुभने शालेय तालुका स्पर्धेत चालण्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशाबद्दल जिल्हा मराठा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार ठुबे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

👉येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील  सोनेवाडी (चास)  या गावचे रहिवासी अभिनेते निर्माते दिग्दर्शक पांडुरंग कुशाबा काळे यांचा कौस्तुभ हा मोठा मुलगा आहे. तो सध्या गुरुकुल सैनिकी स्कूल भोसे मिरज सांगली या शाळेचा विध्यार्थी  आहे. कौस्तुभ पांडुरंग काळे याने मागील सन 2023 मध्ये शालेय तालुका स्पर्धेत चालण्यात प्रथम क्रमांक पटकालवा.

👉येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

सन 2024 ला त्याने शालेय तालुका स्पर्धेत चालण्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तसेच कौस्तुभची जिल्ह्यासाठी  निवड झाली आहे. तरी त्यास पुढील जिल्ह्या स्पर्धेसाठी त्याचे खेळाचे शिक्षक विशाल माळी सर यांनी शुभेच्छा देत कौतुक केले आहे. पण कौतुकने जिल्हयातही दणदणीत विजय मिळावावा यासाठी त्याचे इंजि.विजयकुमार ठुबे, अ‍ॅड.महेश तवले, अ‍ॅड.शिवाजी शिंदे, गोरख दळवी, राजेश परकाळे, सतिष झेंडे, अतुल दरंदले, राजेंद्र लोंढे, संजय साठे सर, धनंजय हराळ, संदेश कार्ले, नितीन वाघ, अशोक वारकड आदीसह सर्व मित्रांकडून, नातेवाईकांकडून तसेच सोनेवाडी ग्रामस्थ, गुरुकुल सैनिकी स्कुल भोसे मिरज यांच्याकडून शुभेच्छा दिल्या आहेत.

👉येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post