जिल्ह्यात वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाचा अंदाज

| अहिल्यानगर | दि.19 ऑक्टोबर 2024 | भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात दि. 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता वर्तविली आहे. जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, दि. 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

या दोन दिवसांसाठी जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष राहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातून तसेच ओढे यापासून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post