भाजपाची पहिली यादी जाहीर....नगरमध्ये कोण पहा...

भाजपाच्या पहिल्या यादीत स्थान....नगरमध्ये कोण पहा...

विखे, कर्डिले, शिंदे,पाचपुते, राजळे यांना उमेदवारी जाहीर

। अहिल्यानंगर । दि.20 ऑक्टोबर । भारतीय जनता पक्षाने विधानसभेची पहिली उमेदवारी यादी आज जाहीर केली. यामध्ये 99 उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये नगरच्या पाच उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत.

यामध्ये नगर जिल्ह्यातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, आणि प्रतिभा पाचपुते यांचा समावेश आहे.

विखे यांना शिर्डीतून, कर्डिले यांना राहुरी मधून, प्रा शिंदे यांना कर्जत -जामखेडमधून, राजळेंना पाथर्डी- शेवगाव मतदार संघातून आणि पाचपुते यांना श्रीगोंदा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विखे, कर्डिले, शिंदे आणि राजळे यांची उमेदवारी निश्चित होती. मात्र, आमदार बबनराव पाचपुते यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post