कोतकर यांचे जल्लोषात स्वागत... आता निवडणुकीच्या भूमिकेकडे लक्ष !

। अहिल्यानगर । दि.24 ऑक्टोबर । माजी महापौर संदीप कोतकर यांचे अनेक वर्षानंतर गुरुवारी (दि.24) रोजी दुपारी नगर शहरामधील केडगाव उपनगरामध्ये  आगमन झाले. यावेळी त्यांच्या समर्थक - कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. केडगावमध्ये प्रवेश झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह नागरिकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

फटाक्यांच्या आतिषबाजीसह त्यांचे स्वागत करण्यात आले. अनेक वर्षानंतर माजी महापौर संदीप कोतकर हे नगरमध्ये आल्याने त्यांना आश्रु अनावर झाले.  मात्र आता विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात नेमकी त्यांची काय भूमिका असणार आणि ते काय निर्णय घेणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post