जिल्ह्यातील शासकीय कार्यालय परिसरातील ११ हजार ६४१, सार्वजनिक ठिकाणच्या ९ हजार ५०२ तर खाजगी मालमत्तेवरील ३ हजार ८२६ अशा एकूण २४ हजार ९६९ जाहिराती काढण्यात आल्या असल्याची माहिती आचारसंहिता कक्षातर्फे देण्यात आली आहे.
अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १ हजार ८६४, सार्वजनिक ठिकाण ३९१ तर खाजगी मालमत्तेवरील ३२० एवढ्या जाहिराती हटविण्यात आल्या.
संगमनेर मतदारसंघ कार्यालय परिसर ८१६, सार्वजनिक ठिकाण १ हजार ८८, खाजगी मालमत्तेवरील २५५, शिर्डी मतदारसंघ कार्यालय परिसर ९१६, सार्वजनिक ठिकाण १ हजार ६४१, खाजगी मालमत्तेवरील ३५१, कोपरगाव मतदारसंघ कार्यालय परिसर ९५४, सार्वजनिक ठिकाण ६१९, खाजगी मालमत्तेवरील ३०९, श्रीरामपूर मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार १३१, सार्वजनिक ठिकाण १ हजार ५५० एवढ्या जाहिराती हटविण्यात आल्या.
नेवासा मतदारसंघ कार्यालय परिसर ३२४, सार्वजनिक ठिकाण ५७७, शेवगाव मतदारसंघ कार्यालय परिसर ८५४, सार्वजनिक ठिकाण ९३७, खाजगी मालमत्तेवरील १ हजार ७२३, राहुरी मतदारसंघ कार्यालय परिसर २५४, सार्वजनिक ठिकाण १४१, खाजगी मालमत्तेवरील २१, पारनेर मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार १२३, सार्वजनिक ठिकाण ९७८, खाजगी मालमत्तेवरील ४९५ जाहिराती काढण्यात आल्या.
अहमदनगर शहर मतदारसंघ कार्यालय परिसर २८६, सार्वजनिक ठिकाण ४१६, खाजगी मालमत्तेवरील ४१, श्रीगोंदा मतदारसंघ कार्यालय परिसर १ हजार २९४, सार्वजनिक ठिकाण ८०२, खाजगी मालमत्तेवरील ३११ तर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये शासकीय कार्यालय परिसर १ हजार ८२५, सार्वजनिक ठिकाणच्या ३६२ जाहिराती काढण्यात आल्या असल्याचे आचारसंहिता कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.