शिवसैनिकांचे अस्तित्व टिकवण्यासाठी निवडणुक लढविणारच : संदेश कार्ले


। अहिल्यानगर । दि.25 ऑक्टोबर । पारनेर आणि नगर शहराची जागा शिवसेनेला दिली नाही, न मागितलेली श्रीगोंद्याची जागा शिवसेनेला सोडली आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप असून शिवसैनिकांचे अस्तित्व टिकवण्यासाठी पारनेर मतदार संघामधून पक्षाकडून किंवा अपक्ष लढणार असल्याचा निर्धार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे शिवसैनिकांचा मेळावा पार पडला. त्यावेळी कार्ले बोलत होते. यावेळी प्रविण कोकाटे, रामदास भोर, डॉ.श्रीकांत पठारे, शरद झोडगे, डॉ.दिलीप पवार, संदीप गुंड, विश्वास जाधव, राजेंद्र भगत, प्रविण गोरे, पोपट निमसे, व्ही.डी काळे, गुलाब शिंदे, रा.वि.शिंदे, मच्छिंद्र बेरड यांच्यासह नगर तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्यनेे उपस्थित होते.

नगर शहर, श्रीगोंदा आणि पारनेर मतदारसंघात शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी 29 तारखेला आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. यावेळी त्यांनी खा.निलेश लंके यांच्यावर टिका केली. लंके यांच्या खासदारकीच्या विजयात शिवसैनिकांचा मोठा वाटा होता. लंके यांनी मोठ्या मनाने शिवसेनेला जागा सोडायला पाहिजे होती असे ते म्हणाले.

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर 

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर  

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर  


Post a Comment

Previous Post Next Post