सोयाबीनची चोरी करणारे ‘एलसीबी’च्या ताब्यात !

| अहिल्यानगर |दि.19 ऑक्टोबर 2024| तालुक्यातील साकत येथील सोयाबीन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे.  मिळालेल्या  माहितीच्या  आधारे  पोलीस  पथकाने दहीगाव व वाळकी रोडने जात अनानाथ गजानन काळे (वय 22) व देवकर गजानन काळे (वय 20, दोन्ही रा. दहिगाव, ता .अहिल्यानगर) यांना  ताब्यात  घेतले. त्याच्याकडे विचारपूस  केली  असता  त्याने  त्यांच्या  इतर  साथीदारांचे  नावे सांगितली आहे.

मिळालेली माहिती माहिती अशी की, फिर्यादी सतीश भानुदास कार्ले (वय 41, रा.साकत, ता. अहिल्यानगर) यांचे शेतातील जनावरांच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी 23 सोयाबीनच्या गोण्या फिर्यादीचे संमतीशिवाय स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता चोरून नेल्या आहे. याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 770/2024 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर यांना चोरीचे उघडकीस न आलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, राहुल सोळुंके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, जालींदर माने, अरूण मोरे तसेच बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, विजय ठोंबरे, मेघराज कोल्हे अशांचे पथक नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. तपास पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन, गुन्हयातील चोरीस  गेला  माल व आरोपीची माहिती घेत असताना फोलाणे यांना सदरचा गुन्हा अनानाथ गजानन काळे, रा.दहिगाव, ता.अहिल्यानगर याने त्याचे साथीदारासह केला असुन तो दहीगाव ते वाळकी जाणारे रोडने साथीदारासह जात आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दहीगाव व वाळकी रोडने जात अनानाथ गजानन काळे (वय 22) व देवकर गजानन काळे (वय 20, दोन्ही रा.दहिगाव, ता.अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार अजय गजानन काळे (फरार), देवानंत धर्मेद्र चव्हाण (फरार), नदिम धर्मेद्र चव्हाण (फरार), साईनाथ गजानन काळे (फरार), चिरंजीव भोसले (फरार) व लड्डया चव्हण (फरार) सर्व रा.दहिगाव, ता.अहिल्यानगर अशांनी मिळून केल्याचे सांगितले. कार्ले वस्ती, साकत येथील शेत वस्तीवरून 23 सोयाबीनच्या गोण्या चोरून आणल्या होत्या. चोरून आणलेल्या गोण्यापैकी 9 सोयाबीनच्या गोण्या श्रीराम ट्रेडींग कंपनी, रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर व 10 सोयाबीनच्या गोण्या सिध्दीविनायक ट्रेडींग कंपनी, वाळकी, ता.अहिल्यानगर यांना विकल्याची माहिती सांगीतली.

तपास पथकाने पंचासमक्ष श्रीराम ट्रेडींग कंपनी, रूईछत्तीसी, ता.अहिल्यानगर येथुन 19 हजार 350 रूपये किंमतीचे 9 सोयाबीनच्या गोण्या व सिध्दीविनायक ट्रेडींग कंपनी, वाळकी, ता.अहिल्यानगर येथून 26 हजार 875 रूपये किंमतीच्या 10 सोयाबीनच्या गोण्या असा एकुण 46 हजार 225/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

👉कोतकर समर्थकांमध्ये जल्लोष 

👉 केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना दिवाळी भेट 

 👉 मनसे स्वबळावर लढणार निवडणूक : राज ठाकरे

 


 

Post a Comment

Previous Post Next Post