केडगाव घरफोडीतील आरोपी गजाआड


| अहमदनगर | दि.05 ऑक्टोबर 2024 | उपनगरीय भागातील केडगावमध्ये रात्रीच्यावेळी घरफोडी करणार्‍या अट्टल गुन्हेगारास कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. गणेश विठ्ठल आव्हाड (वय २४ वर्षे रा. गजानन कॉलनी, साईरथनगर, वडगाव गुप्ता रोड, एमआयडीसी, अहमदनगर ता. जि अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

👉 लोणावळ्यातून स्वीफ्ट डिझायर चोरणार्‍यास नगरमध्ये बेड्या! 

केडगावमधील भूषणनगर येथील फिर्यादीच्या राहत्या घराचीचा कडीकोयंडा उचकटून चोरी केल्याचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं १०७६/२०२४ बी.एन.एस चे २०२३चे कलम ३०५, ३३१(३) ३३१(४) प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना सदरचा गुन्हा हा गणेश आव्हाड याने केला आहे,  अशी माहिती मिळाली. 

👉गजाच्या सहाय्याने दरवाजा उघडून चोरट्यांन लांबविली रोख रक्कम  

त्यानुसार सदर आरोपी हा एमआयडीसी येथे त्याचे रहाते घरी आला आल्याचे समजताच गुन्हे शोध पथकाने गजानन कॉलनी येथे मोठ्या शिताफीने पकडले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्यांनी प्रथम  उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अधिक विेशासात घेवून चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post