मनसे स्वबळावर लढणार निवडणूक : राज ठाकरे


| मुंबई | दि.14 ऑक्टोबर 2024 | गेल्या काही दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शिंदे गटाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत युतीच्या चर्चा सुरू होत्या. त्यामुळे राज ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेची युती होईल अशी शक्यता होती, मात्र ही शक्यता जवळपास मावळल्याचे दिसून येत आहे. कारण रविवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

👉अजित पवार गटाचे बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार!

रविवारी मुंबईत झालेल्या पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यासंदर्भात बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती सोबतच ना आघाडी सोबत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सत्तेमधील पक्ष असेल, असा दावा देखील राज ठाकरे यांनी केला. 

👉जगप्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

Post a Comment

Previous Post Next Post