घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघे जेरबंद

घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

| अहिल्यानगर | दि.11 ऑक्टोबर 2024 | श्रीगोंदा  तालुक्यातील घारगाव येथील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात आला आहे. संदेश उर्फ दौल्या संजय भोसले (वय 20, रा.कोळगाव, ता.श्रीगोंदा), साहिल सुनील चव्हाण (वय 18, रा.अनकुटे, ता.येवला, जि.नाशिक) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

👉 नगर शहराची जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी पक्ष आग्रही : आ. इंद्रविजय गोहिल  

घारगाव येथील फिर्यादी राजू बापुराव जाधव हे त्यांचे घरी झोपले असता रात्री अज्ञात आरोपीतांनी घरात घुसून फिर्यादीचे पत्नीस लाकडी दांडक्याने मारहाण करून तिचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चोरून नेले.तसेच फिर्यादीस आईस गजाने मारहाण केली आहे. याबाबत बेलवंडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि आहेर यांना जिल्ह्यातील ना उघड घरफोडीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करणेबाबत आदेश दिले होते.

👉कल्याण रोडच्या सीनेच्या पूलावरील कामाला गती द्या : महेश लोंढे 

नमुद आदेशान्वये पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ बबन मखरे व पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, जालींदर माने, फुरकान शेख व उमाकांत गावडे अशांचे पथक नेमून आरोपींची माहिती घेणेबाबत रवाना केले. सदरचा गुन्हा हा संदेश उर्फ दौल्या संजय भोसले, (रा.कोळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याने त्याच्या साथीदारासह केला असून, ते पिंपळगाव पिसाजवळ आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. 

👉जिल्ह्यात मूग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजुरी 

त्यानुसार दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी  सदरचा गुन्हा आलुशा उर्फ दिनेश रमेश काळे (रा.मोहोरवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) याच्या मदतीने केल्याची माहिती सांगितली. पंचासमक्ष संदेश भोसले याचे अंगझडती घेतली असता , त्याचेकडून 35 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात अर्धा तोळा वजनाचे सोन्याच्या डोरल्याच्या दोन पळ्या असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ताब्यातील आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी बेलवंडी पोलीस ठाणे येथे मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे. 

👉जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Post a Comment

Previous Post Next Post