जगप्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचे निधन

| मुंबई | दि.10 ऑक्टोबर २०२४ | दोन दिवसांपुर्वी रक्तदाब कमी झाल्यामुळे देशातील जगप्रसिध्द उद्योगपती रतन टाटा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टाटा यांचे आज (दि.९) रोजी मुंबई येथील ब्रीचकँडी रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. 

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती गंभीर होत चालल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र (दि.९) रोजी त्यांनी मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. एक सामान्य कर्मचारी म्हणून 1961-62 मध्ये रुजू झाले. त्यानंतर जेआरडी टाटांनी त्यांना  टाटा ग्रुपचं चेअरमनपद सोपवलं. चेअरमनपद हाती घेतल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांची स्वतःची हिस्सेदारी वाढवली. 1998मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची 'इंडिका' कार टाटा मोटर्सने बनवली. त्यानिमित्ताने रतन टाटा यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण (२००८) आणि पद्मभूषण (२०००) दोन सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते.  ते प्रतिष्ठित कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, बिशप कॉटन स्कूल (शिमला), कॉर्नेल विद्यापीठ आणि हार्वर्डचे माजी विद्यार्थी आहेत.

👉‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ पुढील पाच वर्ष चालू राहील : उपमुख्यमंत्री 

Post a Comment

Previous Post Next Post