गजाच्या सहाय्याने दरवाजा उघडून चोरट्यांन लांबविली रोख रक्कम

गजाच्या सहाय्याने दरवाजा उघडून चोरट्यांन लांवबली रोख रक्कम  

| अहमदनगर | दि.०१ ऑक्टोबर २०२४ | बोरुडे मळा भागात अजिंक्य नगरमध्ये राहणार्‍या एका व्यक्तीचे घर फोडून चोरट्यांनी ५० हजाराची रोकड चोरुन नेली. सोमवारी (दि.३०) रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच या वेळेत ही घटना घडली. या प्रकरणी प्रशांत पंडित ताठे (वय ४१) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप, महावितरणने ओलांडला ५० हजारांचा टप्पा

फिर्यादी प्रशांत ताठे हे सोमवारी सकाळच्या दरम्यान कुटुंबासह चुलते राजेश छगन ताठे यांच्या घरी गेले होते. दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर त्यांच्या मुली घरी गेल्या असता चोरी झाल्याचे समोर आले. चोरट्यांनी घरातील किचनच्या काचा काढून गजाच्या सहाय्याने किचन रुमचा दरवाजा उघडून प्रवेश केला.

किरण काळेंचा पाठपुरावा; १ कोटी ८२ लाखाचे मिळाले थकीत वेतन

तसेच घरातील कपाटात ठेवलेली ५० हजारांची रोकड चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (३) ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग ...  

Post a Comment

Previous Post Next Post