'तुळजाभवानी माता' मंदीरातील नवरात्रोत्सवाची सांगता


| अहिल्यानगर | दि.19 ऑक्टोबर 2024 |  अरणगाव येथे तुळजाभवानी माता मंदिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जगदंबा युवा मंच व संस्कार क्लासेस प्ले ग्रुप व नर्सरी स्कूल यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच यावेळी देवीच्या पालखी मार्गावरती विविध समाज प्रबोधनपर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. 
 
 
स्पर्धांमध्ये शंभर पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण अरणगावचे सरपंच पोपट पुंड, उपसरपंच  विठ्ठल दळवी, ग्रामपंचायत सदस्य सागर कलापुरे, केंद्रीय विद्यालय व्ही. आर. डी. ई प्राध्यापक धाकतोडे आदीच्या उपस्थितीत करण्यात आला.


नवरात्रोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमासह स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. अरणगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक गोरख अण्णा कलापुरे, अकॅडमीच्या संचालिका प्राध्यापिका अमृता अमोल देवकर या सर्वांच्या हस्ते सर्व स्पर्धकांना बक्षिसांचे व प्रमाणपत्रांचे  वाटप करण्यात आले. तसेच सदर व प्रसंगी सक्षम राज्यस्तरीय टॅलेंट SMTs, (Sakshum Maharashtra Talent Search pariksha -2024)  या राज्य स्तरावरील परीक्षेचे शुभारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना अकॅडमीच्या संचालिका प्राध्यापिका अमृता अमोल देवकर म्हणाल्या की, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, स्पर्धा परीक्षा आपल्या ज्ञानाला नवा आयाम देण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. यामुळे आपल्याला नव्या गोष्टी शिकता येतात आणि आपल्या कौशल्यांना धार आणता येते. स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन, अपण आपली विचारशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि तंत्रज्ञानाच्या बदलांबाबतची माहिती वाढवू शकतो. हे सर्व आपल्याला वैयक्तीक आणि व्यावसायिक विकासात मदत करते असे मत त्यांनी मांडले.

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर 

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर  

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर




Post a Comment

Previous Post Next Post