288 मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत किती उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल...वाचा

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024

288 मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत 153 उमेदवारांचे 164 नामनिर्देशन पत्र दाखल


| मुंबई | दि.23 ऑक्टोबर 2024 | महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघात निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज दुसरा दिवस आहे. दुसर्‍या दिवशी म्हणजे 23 ऑक्टोबर 2024 रोजी राज्यातून आजपर्यंत 153 उमेदवारांचे 164 नामनिर्देशन पत्र भरण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली असून 22 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.  नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून 29 ऑक्टबरला नामांकन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जाची 30 ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन 4 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.


 

Post a Comment

Previous Post Next Post