अवैध दारूविक्री करणार्‍या 14 हॉटेलवर छापे

अवैध दारूविक्री करणार्‍या 14 हॉटेलवर छापे

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

14 जणांवर गुन्हे दाखल ; 65 हजारांचा मुद्देमाल जप्त

। अहिल्यानगर । दि.24 ऑक्टोबर 2024 । अवैध दारु विक्री प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जामखेडमधील आठ व राहाता तालुक्यातील सहा अशा एकूण 14 हॉटेलवर छापे टाकून कारवाई केली. या प्रकरणी 14 जणांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, एकूण 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एलसीबीच्या पथकाने दिनांक 21 रोजी जामखेड, राहाता व लोणी पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना दारूविक्री करणार्‍या हॉटेलवर छापे टाकून ही कारवाई केली.

त्यात जामखेडमध्ये 8, राहात्यात 6 व लोणी हद्दीतील 2 हॉटेलचा समावेश आहे. कारवाईमध्ये एकूण 14 स्वतंत्र गुन्हे दाखल करुन 14 आरोपींच्या ताब्यातून 65 हजार 40 रुपये किंमतीची देशी- विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई चालू राहणार आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, अंमलदार बबन मखरे, अतुल लोटके, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, विशाल तनपुरे, प्रमोद जाधव तसेच बापूसाहेब फोलाणे, रणजीत जाधव व रोहित मिसाळ यांच्या पथकांनी केली.

👉 शरद पवारांचे 45 शिलेदार जाहीर.. नगरमध्ये कोण... पहा 

👉 आमदार संग्राम जगताप यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल  

 👉संभाजी ब्रिगेड स्वबळावर 50 जागा लढणार : भानुसे

 

 

Post a Comment

Previous Post Next Post