हिंदी लघुकथा लेखन स्पर्धेत वृषाली हिवाळे द्वितीय


| अहमदनगर | दि.12 सप्टेंबर 2024 |  येथील डॉ. शंकर केशव आडकर चॅरिटेबल ट्रस्ट व हिंदी सृजन सभा यांच्या संयुक्त विद्यमाने नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी कविता - लघुकथा लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  लघुकथा लेखन स्पर्धेत केडगावातील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी वृषाली अनिल हिवाळे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. 

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

या स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुवारी अहमदनगर महाविद्यालयाच्या लायब्ररी सभागृहात झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रितम कुमार बेदरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव येथील न्यू आर्टस महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. पुरूषोत्तम कुंदे हे होते. व्यासपीठावर सृजन सभेच्या अध्यक्ष व नगर कॉलेज हिंदी विभागप्रमुख प्रा.ऋचा शर्मा, स्नेहालय व आडकर ट्रस्टचे सचिव अशोक कुरापती उपस्थित होते. 

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

या लघुकथा स्पर्धेत वृषाली हिने 'पापा की एंजिओप्लास्टी के बाद परिवार की यादगार मैराथान...' या विषयावर लघुकथा लिहिली होती. त्यात तिने तिच्या वडिलांची अँजिओप्लास्टीनंतर कुटुंबासाेबत केलेल्या पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेचे अनुभव मांडले होते. त्या कथेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. रोख रक्कम व  सन्मानपत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे.  वृषाली ही पत्रकार अनिल हिवाळे यांची कन्या आहे. 

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

 

Post a Comment

Previous Post Next Post