गुरुवार पासून मान्सूनचा परतीचा प्रवास

| मुंबई | दि. 14 सप्टेंबर  2024 | यंदा मान्सूनने चांगली हजेरी लावली आहे. मान्सूनच्या निरोपाची वेळ आता जवळ आली आहे. आणखी पाच दिवसांनंतर म्हणजेच १९ सप्टेंबरपासून मान्सून माघारी परतायला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

💢 ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

महाराष्ट्रासह देशभरात चांगला पाऊस झाला. एरव्ही कोरडाठाक होणारा मराठवाडा भिजून चिंब झाला. राज्यातील बहुतांश धरणे शंभर टक्के भरली. देशात सरासरी ७७२.५ मि.मी. पर्जन्यमान असते. पावसाने यंदा कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण केले आहे.

💢  दीपावली सणानिमीत्त तात्पुरते फटाके विक्री परवान्याबाबत आवाहन

धो-धो बरसलेला मान्सून १९ ते २५ सप्टेंबर या दरम्यन परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. सर्वसाधारणपणे मान्सून १ जूनला केरळमध्ये पोहोचतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पसरतो. त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास १७ सप्टेंबरच्या आसपास सुरू होतो.

💢  मोदी सरकारचा जेष्ठ नागरीकांसाठी मोठा निर्णय !  

Post a Comment

Previous Post Next Post