गायक कन्हैया मित्तल काँग्रेसच्या वाटेवर ?


चंदीगड  | दि.09 सप्टेंबर 2024 | हरियाणा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये नाराजी वाढलेली आहे. भाजपमधील काही बड्या नेत्यांनी राजीनामे देखील दिले असल्याचे समोर आले आहे.

👉 ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

या दरम्यान प्रसिद्ध गायक कन्हैया मित्तल काँग्रेसच्या वाटेवर आहेत. भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज आहेत. ’जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे’ हे त्यांचे गाणे उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत गाजले होते. 

👉 ...-कुमारी सृष्टी विजयकुमार पादिर हिचे घवघवीत यश

यासंदर्भात बोलतांना कन्हैया मित्तल म्हणाले की, माझे मन काँग्रेस सोबत जोडले जात असल्याचे म्हटले आहे. मला असे वाटते की काँग्रेस पक्षासोबत जोडले जावे, असे मित्तल म्हणाले. विनेश फोगाट देखील काँग्रेसमध्ये गेली आहे, त्यानंतर तिला टिकेला सामोरे जावे लागत आहे. यामुळे मला वाटते तिचे समर्थन करण्यासाठी पक्षाला पाठिंबा दिला पाहिजे. जर गोष्टी जुळून आल्या तर काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे कन्हैया मित्तल म्हणाले.पुढे ते म्हणाले, 

👉 कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

 

Post a Comment

Previous Post Next Post