कोतवाली पोलिसांची कारवाई : चोरट्यांकडून २९ दुचाक्या ताब्यात

 

| अहमदनगर | दि.०9 सप्टेंबर २०२४ | लग्न, अंत्यविधी, दशक्रियाविधी, हॉस्पिटल पार्किंग आदी ठिकाणी दुचाकी चोरी करणारी टोळी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतली. टोळीकडून सरासरी १५ लाखांच्या २९ दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईत कोतवाली पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
 
आरोपींमध्ये बाबासाहेब ज्ञानदेव खाडे (वय ४२, राहणार लाखपढेगाव, ता. राहुरी, जि.अ.नगर), सुधाकर जाधव (रा.टाकळीमियाँ, ता.राहुरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. तर  किशोर जयसिंग पटारे (रा. पिंपळगाव माळवी, ता.नगर) हा फरार झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार पटारे हा त्याच्या साथीदारासह नगर शहर जिल्हयात तसेच पूणे, बिड आदी परिसरातील लग्न, अत्यंविधी, दशक्रियाविधी अशा विविध ठिकाणवरुन दुचाकी चोरुन ओळखीच्या लोकांना गाडीचे पेपर आणून देतो म्हणून त्यांच्याकडून २ - ३ हजार रुपये घेऊन त्यांना चोरीच्या दुचाकी विक्री करत असल्याची खत्रीशीर माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दराडे, उपनिरीक्षक महेश शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार योगेश भिंगारदिवे,

विशाल दळवी, गणेश धोत्रे, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, सलीम शेख, अविनाश वाकचौरे, अभय कदम, अमोल गाढे, सतिश शिंदे, अतुल काजळे, राम हंडाळ, वर्षा पंडीत, अशोक सरोदे, लक्ष्मण बोडखे, अनुप झाडबुके, पल्लवी रोहकले, पुजा दिक्कत, दक्षिण मोबाईल सेलचे अंमलदार राहुल गुंड्डू यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post