तब्बल नऊ चैन स्नॅचिंग करणारा ‘एलसीबी’च्या ताब्यात

जबरी चोरी,चेन स्नॅचिंग करणारा  फरार आरोपी एलसबीच्या ताब्यात


| अहमदनगर| दि. 02 सप्टेंबर 2024 |  चैन स्नॅचिंगचे तब्बल नऊ गुन्ह्य असलेल्या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पु घिसाडी (रा.इंदिरानगर, वॉर्ड क्रमांक 03, श्रीरामपूर, जि.अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग 

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिलेले आहेत. नमुद आदेशाप्रमाणे पोनि आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, बाळासाहेब खेडकर, विशाल तनपुरे, फुरकान शेख यांचे पथक तयार करुन रवाना केले होते. 

येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग 

श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये फरार आरोपींची माहिती काढत असताना पथकास सराईत आरोपी राजेंद्र चव्हाण हा त्याचे राहते घरी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्यास ताब्यात घेतले. पथकाने ताब्यातील आरोपीस संगमनेर शहर पो.स्टे.गु.र.नं. 937/2023 भादवि कलम 392,34 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. 

येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग 

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक,अहमदनगर,वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक,श्रीरामपूर व श्री सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग, संगमनेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग 

Post a Comment

Previous Post Next Post