मोदी सरकारचा जेष्ठ नागरीकांसाठी मोठा निर्णय ! काय आहे वाचा....


| मुंबई | दि. 12 सप्टेंबर | बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. विविध योजनेनंतर आता प्रथमच जेष्ठ नागरीकांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.  आता ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य योजनेंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्यावर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मोदी सरकारच्या या निर्णयाने अनेक जेष्ठ नागरीकांना दिलासा मिळणार आहे. तसेच आयुष्यमान भारत योजनेंतर्गत वर्षाला ५ लाख रुपयांचा इन्शूरन्सकव्हर उपलब्ध  आहे. 
 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी मोदी कॅबिनेटच्या या निर्णयाचा माहिती दिली. ’या योजनेच्या मंजुरीनंतर ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी त्यासाठी पात्र होतील. पात्र वरिष्ठ नागरिकांना अइ झच-गअध नुसार वेगळे कार्ड दिले जाईल,’ असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.


यांना लाभ मिळणार नाही?

- संघटित क्षेत्रात काम करणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
-ज्या लोकांकडे कायमस्वरूपी घरं आणि वाहनं आहेत ते या योजनेच्या बाहेर आहेत.
- ज्या लोकांचा भविष्य निर्वाह निधी कापला जातो त्यांनाही या योजनेतून बाहेर ठेवण्यात आले आहे.
- एडखउ सदस्य देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
- सरकारी कर्मचारी आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत येत नाहीत.
- आयकर भरणारे नागरिकही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

Post a Comment

Previous Post Next Post