शरद पवारांनी घेतले ‘लालबाग राजाचे‘ दर्शन

| मुंबई | दि.10 सप्टेंबर | महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची धामधूम सध्या पाहिला मिळत आहे. गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेला लालबाग परिसर सध्या  ’लालबागच्या राजा’च्या जयकारानं फुलून गेला आहे. यातच आता यंदा  लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी विविध राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटी, उद्योजक येत असतात अशातच सोमवारी शरद पवार यांनी लालबाग राजाचे दर्शन घेतले.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

सध्या ’लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी राजकारणी, सेलिब्रिटी, उद्योजक आणि दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. ’नवसाला पावणारा’ गणपती अशा प्रकारची ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून अनेक दिग्गज हजेरी लावत आहेत. 

👉येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

सोमवारी सकाळी शरद पवार हे आपली नात आणि जावयासह ’लालबागच्या राजा’च्या चरणी नतमस्तक झाले. यापूर्वी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना ते ’लालबागच्या राजा’च्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर कोरोना काळात लालबागच्या राजाची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती, तेव्हा मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. 

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

त्या कार्यक्रमाला शरद पवारांनी हजेरी लावली होती. त्यामुळं ’लालबागच्या राजा’चं दर्शन घेण्याची शरद पवारांची ही दुसरी वेळ आहे. शरद पवारांनी लालबाग राजाचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा उभणार असल्याचे भाकीत काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. शनिवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक राजाचं दर्शन घेतलं. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील दर्शन घेतले आहे. 

👉येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग 

Post a Comment

Previous Post Next Post