सीताराम सारडा विद्यालयाचे कॅरम स्पर्धेत वर्चस्व

 

| अहमदनगर | दि.25 सप्टेंबर 2024 | नगर जिल्हा क्रीडा अधिकारी व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच कॅरम स्पर्धा वाडीयापार्क या ठिकाणी संपन्न झाल्या.अत्यंत खेळीमेळीच्या व चुरशीच्या झालेल्या कॅरम स्पर्धेमध्ये सिताराम सारडा विद्यालयातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

या स्पर्धेमध्ये १४, १७, १९ या वयोगटात पार पडल्या १७ वर्षे मुलांच्या वयोगटांमध्ये शेख मोहम्मद मुस्तकीन तन्वीर अजिंक्य ठरला. तर मोहम्मद कैफ हा दुसरा आला. १४ वर्षे वयोगटात खान मुशाहीद हा अजिंक्य ठरला.  १९ वर्षे वयोगटात यशराज माने याने तृतीय क्रमांक पटकावला.

मुलींमध्ये १४ वर्षे वयोगटात शेख हुमेरा ही अजिंक्य ठरली तर योजना दिनकर व अंजली  वाडेकर यांनी अनुक्रमे प्रथम व षष्ठम स्थान प्राप्त केले. १७ वर्षे वयोगटात शेख सीनम व साळवे स्वाती अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त केले. या सर्वांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.

खेळाडूंच्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी,  कार्याध्यक्ष अॅड अनंत फडणीस, विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल ढगे, पर्यवेक्षक गोविंद धर्माधिकारी व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी भावी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचा शालेय समिती चेअरमन अजित बोरा यांचे हस्ते विषेश सन्मान करण्यात आला.  याप्रसंगी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.  सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुनिल कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post