एमआयडीसी पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा

| अहमदनगर | दि.०5 सप्टेंबर २०२४ | नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गजराजनगर भागात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगारावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून पाच जुगार्‍यांना अटक केली आहे. एक जण पसार झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली आहे. 

👉 कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

संदीप सुनील पवार, सुनील बबन शिंदे (दोघे रा. गजराजनगर), भारत जगन्नाथ शिंदे, राहुल दत्तात्रय कुर्‍हाडे (दोघे रा. शेंडी, ता. नगर), सुभाष एकनाथ ससे (रा. ससेवाडी, जेऊर, ता. नगर), मोहन जठाडे (पसार, पूर्ण नाव, पत्ता नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या जुगार्‍यांची नावे आहेत. पोलीस अंमलदार जससिंग शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

👉एसटी कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गजराजनगर भागात अद्विका कार्सच्या पाठीमागील मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती. त्यांनी एक पथक नियुक्त करून मंगळवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास छापा टाकला. 

👉तब्बल नऊ चैन स्नॅचिंग करणारा ‘एलसीबी’च्या ताब्यात

यावेळी तिरट जुगार खेळताना पाच जण मिळून आले. एक जण पसार झाला. ताब्यात घेतलेल्या पाच जणांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, चार दुचाकी, पाच मोबाईल असा एकुण दोन लाख ६१ हजाराचा मुद्देमाल मिळून आला तो पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुशांत दिवटे करत आहेत.

👉 नगरमधील मंडळाना आता एक क्लिकवर...

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मोंढे, पोहेकाँ सुशांत दिवटे, पोना विष्णू भागवत, पोकाँ सूरज देशमुख, पोकॉ भगवान वंजारी यांनी केली आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post