पुण्यात राष्ट्रवादी माजी नगरसेवकावर गोळीबार करत कोयत्याने हल्ला


| पुणे | दि.01 सप्टेंबर 2024 | पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी नाना पेठेत गोळीबार करण्यात आला. आंदेकर यांच्यावर पाच राऊंड फायर केल्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला असल्याची माहिती समजली आहे. आंदेकर यांच्यावर हल्ला कारुन आरोपी पसार झाले आहेत. गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली.

👉 अपघात नियंत्रणासाठी प्रशिक्षित वाहनचालक आवश्यक : मंत्री नितीन गडकरी

या हल्लयामध्ये आंदेकर गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी पुण्याच्या मध्यभागात गोळीबाराचा थरार पाहिला मिळाला. 

👉 ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

या घटनेमध्ये पाच राऊंड फायर झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारामागचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस करत आहे.

👉सहकारी बँकेच्या संचालकांनी नियमानुसार बँक चालवावी : पवार 

Post a Comment

Previous Post Next Post