हर्षवर्धन पाटील हाती घेणार तुतारी?

| पुणे | दि.28 सप्टेंबर 2024 |  विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच पक्षांतर होतांना दिसून येत आहे. भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार अशी चर्चा सुरू असतांना त्यांनी यासंदर्भात शनिवारी प्रतिक्रिया दिली आहे. 

👉 किरण काळेंचा पाठपुरावा; १ कोटी ८२ लाखाचे मिळाले थकीत वेतन

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आमचा मतदारसंघांमध्ये जनता दरबार सुरू होता. आज शेवटचा जनता दरबार पार पडला. जनता दरबाराच्या माध्यमातून लोकांच्या अडचणी, शेतकर्‍यांच्या समस्या आम्ही जाणून घेत आहोत.

👉 केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

लोकांचा आग्रह आहे की मी इंदापूरमधून निवडणूक लढवली पाहिजे आणि लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ असल्याने त्यांच्या मताचा विचार करावा, असा आग्रह असल्याचे ते म्हणालेत. त्यामुळे निवडणूक लढवण्याच्या संदर्भात मतदारसंघातून कार्यकर्त्यांचे प्रचंड प्रेशर असून त्या संदर्भात मला निर्णय घ्यावाच लागेल असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. 

👉 जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Post a Comment

Previous Post Next Post