मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा ; अरणगाव शाळा नगर तालुक्यात प्रथम

अरणगाव शाळा नगर तालुक्यात प्रथम

मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा , उपक्रम ;तीन लाखाच्या बक्षिसाची ठरली मानकरी

 

| अहमदनगर | दि.15 सप्टेंबर 2024 |राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब  आंबेडकर आदर्श शाळा  योजनेअंतर्गत  ’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा‘ टप्पा क्रमांक 2 अभियान राबवण्यात येत असून हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरीता राबविण्यात येत आहे. सदर अभियानात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरणगाव यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

या अभियानाच्या माध्यमातून शाळेचा विविध प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा, शासन अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, विकसित करण्यासोबतच अध्ययन - अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता,  चांगले आरोग्य,राष्ट्रीय एकात्मतेची भावना, व्यावसायिक शिक्षणाची तोंड ओळख, अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास, शासकीय योजनांचा लाभ इत्यादी अशा अनेक विविध घटकांचा या उद्दीष्टाने काम करत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविल्यामुळे शाळेला तीन लाख रुपयांचा निधी बक्षिस रूपाने दिला जाणार आहे.

👉  गुरुवार पासून मान्सूनचा परतीचा प्रवास 

या बक्षिसाचा उपयोग शाळा विकासासाठी होणार आहे. त्याबाबत नगर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी  बाबुराव जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी निर्मला साठे, केंद्रप्रमुख संजय धामणे यांनी शाळेचे अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाच्या यशस्वीते करता शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद दळवी, उपाध्यक्ष गहिनीनाथ पुंड, सर्व सदस्य, सरपंच पोपट पुंड, उपसरपंच विठ्ठल दळवी, सर्व ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ मुदळ यांच्यासह सर्व पालक, ग्रामस्थ तसेच 

👉  पारनेरमध्ये आधार केंद्र सुरू करा : खा. नीलेश लंके 

शाळेतील शिक्षिका कदम संगीता, कदम कृपा, दळवी अलका, कदम ज्योती, गारुडकर गिरिजा, बडगु भाग्यलक्ष्मी, गवळी कमल, शेळके संगीता तसेच  सर्व विद्यार्थी, शा.पो.आ. मदतनिस यांनी विशेष परिश्रम घेतले. याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका लहाकर रेखा यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे ऋण व्यक्त केले आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्व महिला शिक्षिकांचा शाल व बुके देऊन सन्मान केला. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरणगाव शाळेतअध्यापन करणाऱ्या सर्व महिला शिक्षिका , विद्यार्थी व पालक यांच्या अथक प्रयत्नातून या अभियानात प्रथम क्रमांक मिळवून गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
 
-  शरद दळवी,  शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष

 

Post a Comment

Previous Post Next Post