नगरमधील मंडळाना आता एक क्लिकवर ‘गणेशात्सव मंडप उभारणी परवानगी’

| अहमदनगर| दि. 02 सप्टेंबर | 2024 | गणेशोत्सवात व इतर सण - उत्सव काळात मंडप उभारणी, स्वागत कमानी, रनिंग मंडपसाठी सर्व परवानग्या एकाच क्लिकवर मिळणार आहेत.महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका, महावितरण व शहर वाहतूक शाखा यांच्यातर्फे संयुक्तपणे एक खिडकी योजनेचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी  www.amcfest.in या संकेतस्थळावर गणेश मंडळांना विनाशुल्क परवानगीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

👉 तब्बल नऊ चैन स्नॅचिंग करणारा ‘एलसीबी’च्या ताब्यात 

यंदाच्या वर्षी पासून महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. त्यावरून परवानग्या दिल्या जाणार आहेत. मात्र, जागामालक अथवा सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच स्थानिक पोलिस ठाण्याची परवानगी गणेश मंडळांना त्यांच्या स्तरावर घ्यावी लागणार आहे. 

👉पुण्यात राष्ट्रवादी माजी नगरसेवकावर गोळीबार करत कोयत्याने हल्ला

राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने प्रदूषण नियंत्रणासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. पर्यावरण रक्षणासाठी मूर्ती शाडू मातीच्याच वापराव्यात. ध्वनी प्रदूषणाबाबत कायदे व शासकीय नियमांचे पालन करावे. मंडळाने घेतलेल्या सर्व परवानग्या मंडप किंवा कमानींच्या दर्शनी भागात लावाव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post