किरण काळेंचा पाठपुरावा; १ कोटी ८२ लाखाचे मिळाले थकीत वेतन

| अहमदनगर | दि.29 सप्टेंबर 2024 |अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यावधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलने, धरणे, मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलेच चर्चेत होते. काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे ५७८ कामगारांना न्याय मिळावा, यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात आला होता. अखेर या लढ्याला यश आले असून काळे यांच्या पाठपुराव्यामुळे माथाडी मंडळाच्या खात्यावर १ कोटी ८२ लाख रुपये जमा झाले आहेत. ही बातमी समजतात रेल्वे माल धक्क्यातील कामगारांनी फटाके फोडून गुलाल उधळत एकच जल्लोष केला. यावेळी काळे यांचा सत्कार करण्यात आला. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणी दाखल याचिकेवर कामगारांचे आणि वेतन थकवणार्यांचे म्हणणे ऐकून १ एप्रिल २०२१ ते २५ एप्रिल २०२३ या कालावधीतील थकीत वेतन वसुलीच्या ४०% तर मे ते डिसेंबर २०२३ या कालावधीतील ६०% रक्कम कोर्टात भरण्याचे ठेकेदारांना निर्देशित केले आहे. त्यानंतर देखील प्रशासकीय स्तरावर दिरंगाई सुरू होती. मात्र काँग्रेस पक्षाने यासाठी काळे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच आज कामगारांची  दिवाळी गोड होणार आहे. आमच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे नगर माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर विभागाचे अध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी म्हटले आहे.
 किरण काळे म्हणाले, हा कामगार एकजुटीचा विजय आहे. 

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उबाळे, भिंगारदिवे यांच्या पुढाकारातून छेडण्यात आलेली तीव्र आंदोलने, निवेदने, सातत्यपूर्ण पाठपुरावा, मोर्चा याची दखल महसूल विभाग, माथाडी मंडळाला अखेर घ्यावी लागली. त्यामुळेच कामगारांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयाचे काँग्रेस व कामगारांच्या वतीने मी स्वागत करतो. यावेळी जयराम आखाडे, पोपट लोंढे, रोहिदास भालेराव, पंडित झेंडे, वसंत पेटारे, विलास गुंड, सागर पोळ, भगवान शेंडे, किशोर ढवळे, विजय वैरागर, दिपक काकडे, गणपत वाघमारे, बाबासाहेब वैरागर, देवराम शिंदे, किशोर जपकर, अनील जपकर, अनील कार्ले, संतोष भालेराव, संजय माळवे, कैलास कार्ले, सचिन वाघमारे, प्रशांत लक्ष्मण गायकवाड,आदींसह कामगार उपस्थित होते.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post