संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी १०९८ टोल फ्री क्रमांक

| अहमदनगर | दि.०६ सप्टेंबर २०२४ |  संकटग्रस्त बालकांना तातडीने मदतीसाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास   विभागामार्फत ० ते १८ वयोगटातील  कोणत्याही प्रकारच्या अडचणीत अथवा संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्प लाईन सेवा १०९८ संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. 

👉 कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी

या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना २४x७ हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात.  १०९८ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन  महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी १०९८ टोल फ्री क्रमांक

👉येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग



Post a Comment

Previous Post Next Post