ट्रकचालकास लुटणारा एक भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात ; एकाचा शोध सुरु


| अहमदनगर| दि. 02 सप्टेंबर | 2024 | नगर-सोलापूर रस्त्यावर परप्रांतीय ट्रकचालकास लुटणार्‍या दोघांपैकी एका आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या बारा तासांत जेरबंद केले. सागर उर्फ पिल्या गुलाब सकट (वय २६ वर्षे, रा. तुक्कडओढा, दरेवाडी शिवार ता. नगर) असे त्याचे नाव असून, त्याने साथीदार दीपक राजेंद्र बेरड रा. दरेवाडी ता. नगर) याच्यासमवेत मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
 

दि. ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास नगर-सोलापूर रस्त्यावरील मुठ्ठी चौकाजवळ फिर्यादी किरण मैमुन मलीक (वय ३० वर्षे, रा. काटगुडी कृष्णा मंदीर, बेंगळुरू, राज्य कर्नाटक) हे ट्रक (केए ५३ एए ४६१९) रस्त्याकडेला उभा करून झोपलेले असताना अज्ञात दोघांनी केबीनमध्ये येऊन ३० हजार रुपये रोख रक्कम व सात हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ३७ हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने हिसकावून घेतला होता. 
 
 
याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेनंतर भिंगार कॅम्पचे सपोनि जगदीश मुलगीर यांना गोपनीय माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील आरोपी नगर शहरातील चांदणी चौक येथे येणार आहे. त्यानुसार त्यांनी पथकास सूचना दिल्या. पथकाने सापळा रचून पिल्या सकट यास अटक केली. त्याचा साथीदार दीपक बेरड याचा पोलिस शोध घेत आहे. 
 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जगदीश मुलगीर, पोसई किरण सांळुके, उपनिरीक्षक पतंगे, सफौ कैलास सोनार, पोहेकॉ संदीप घोडके, दीपक शिंदे, रवी टकले, रामनाथ डोळे, पोकॉ समीर शेख, प्रमोद लहारे, नितीन शिंदे, चालक काळे व बेरड यांच्या पथकाने केली.
 
 

Post a Comment

Previous Post Next Post