मराठा आरक्षणासाठी नगरमध्ये ‘अन्नत्याग आंदोलन’



| अहमदनगर | दि.20 सप्टेंबर 2024 | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ नगर तहसील कार्यालयासमोर गोरख दळवी (रा.सोनेवाडी), संतोष आजबे (रा.गजानन कॉलनी, नवनागापूर) आणि सखाराम गुंजाळ (रा.बाराबाभळी) या 3 मराठा बांधवांनी शुक्रवारी (दि.20) दुपारपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. 

पांढरी पुलावर आठा तासामध्ये तीन अपघात परंतु....

सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या अन्न त्याग आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी नगर शहर व तालुक्यातील मराठा बांधव यावेळी उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरु आहे. 

दीपावली सणानिमीत्त तात्पुरते फटाके विक्री परवान्याबाबत आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी या लढ्याला मोठे बळ दिले आहे. ते आता निर्णायक आंदोलन करत आहेत. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करणे, शिंदे समितीस मुदतवाढ देवून तिचे कामकाज चालू ठेवावे, मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेट लागू करावे आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.

संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी १०९८ टोल फ्री क्रमांक

सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी आणि जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाजाच्यावतीने नगर तहसील कार्यालय येथे गोरख दळवी, संतोष आजबे, सखाराम गुंजाळ यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या अन्न त्याग आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी नगर शहर व तालुक्यातील मराठा बांधव यावेळी उपस्थित होते.  

येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post