अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा

| अहमदनगर | दि.27 सप्टेंबर 2024 | नगर- मनमाड रस्त्यावर एमआयडीसीत सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने छापा टाकला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुरवठा निरीक्षक विदुला अनिल बेल्हे (रा. आगरकर मळा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. 

👉 जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

राजू साहेबराव पवार (रा. लक्ष्मीआई मंदिरा जवळ, नागापूर), चंद्रशेखर त्रिंबक कांबळे (रा. गांधीनगर, बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून घरगुती वापराच्या सात भरलेल्या टाक्या, एक रिकामी टाकी, वजन काटा, इलेक्ट्रीक मोटार, रिक्षा (एमएच 16 सीई 2494), चार बॅटर्‍या असा 61 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

👉 ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता... 

ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी नगर शहरात स्टिंग ऑपरेशन राबवत घरगुती गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा भांडाफोड केला. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर करणार्‍यांविरूध्द कारवाई करण्यात आली आहे.

👉 शरद पवार यांच्या हस्ते लंके प्रतिष्ठाणच्या फिरत्या दवाखान्याचे... 

Post a Comment

Previous Post Next Post