‘अहमदनगर बंद’ची आज मराठा समाजाकडून हाक!

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ उतरणार रस्त्यावर

| अहमदनगर | दि.22 सप्टेंबर 2024 | मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे गेल्या 6 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या या आमरण उपोषनाच्या समर्थनार्थ विविध जिल्ह्यात आंदोलन आमरण सुरू आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने बीड बंदची हाकल दिल्यानंतर जालना जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आली आहे. त्यानंतर अहमदनगरमध्ये देखील मराठा समाजाने सोमवारी 23 मार्च रोजी अहमदनगर बंदची हाक देण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोमवारी अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अहमदनगर तहसील कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून मराठा बांधवांनी आमरण उपोषण देखील सुरू आहे.

सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा, हैदराबाद गॅझेट लागू करा, सातारा गॅझेट लागू करा, बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करा, मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या, अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू असून, त्याच पोर्शभूमीवर सोमवारी विविध जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली असून अहमदनगर जिल्हा बंदची देखील हाक देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post