शिवस्मारकासंदर्भात महामहिम राज्यपालांसोबत संभाजी ब्रिगेडची सकारात्मक चर्चा : डॉ.शिवानंद भानुसे

शिवस्मारकासंदर्भात महामहिम राज्यपालांसोबत संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा

प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांची माहिती

| मुंबई | दि.22 सप्टेंबर 2024 |  छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे अरबी समुद्रात न होता मुंबई येथील राजभवन या ठिकाणी व्हावे. ही संभाजी ब्रिगेडची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. अनेक वर्षापासून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. यासाठी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे महासचिव सौरभ खेडेकर यांनी 23 ऑगस्ट रोजी पुणे येथील मेळाव्यात घोषणा केली होती,

की, त्यासंदर्भात सरकारनं त्वरित निर्णय न घेतल्यास 24 सप्टेंबर पासून आम्ही राजभवनवर कुदळ मोर्चा नेणार होतो. त्या संदर्भात राज्यपाल महोदयांनी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी  22 सप्टेंबर 2024 रोजी बोलावले होते आणि संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाची महामहिम राज्यपाल महोदय सोबत सकारात्मक चर्चा झाली. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे अरबी समुद्रात होणे शक्य नाही. त्यामुळे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला निवेदन देऊन हे स्मारक आरबी समुद्रात करण्यापेक्षा राजभवन या ठिकाणी करावं. कारण आरबी समुद्रात दहा वर्षांपूर्वी आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलं होतं.

आजपर्यंत एक वीटही न लावता शेकडो कोटी खर्च झालेले आहे. असेच हजारो कोटी पाण्यात जाणार आणि शिवस्मारक स्वप्नच राहणार  त्याचबरोबर पर्यावरणाचा प्रश्न, भरती- ओहोटीमुळे, वातावरणामुळे, पावसाळ्यात चार महिने स्मारक बंद राहणार आणि सामान्य माणसाला ते परवडणार नाही. अशा अनेक कारणांमुळे शिवस्मारक हे राजभवन या ठिकाणी व्हावे ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

राजभवन हे सुद्धा एक 48 एकराचे बेट आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल आरमार उभारल होतं. म्हणून समुद्राच्या काठी छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक व्हावं आणि कमी पैशात ते स्मारक होईल. त्याठिकाणी म्युझियम उभारता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आदर्श आपल्याला जगभर सांगता येईल. त्या दृष्टिकोनातून हे शिवस्मारक राज्यभवन या ठिकाणी व्हावं. आणि राजभवन मंत्रालयाच्या बाजूला किंवा इतर ठिकाणी व इतर शहरात सुद्धा केल जाऊ शकत. म्हणून आम्ही राजभवन या ठिकाणी शिवस्मारक व्हावे यासंदर्भात आज राज्यपाल महोदयांशी चर्चा केली.

चर्चा सकारात्मक झाली. ते काय अंमलबजावणी करतात त्याची वाट आम्ही काही दिवस बघणार आहोत. नाहीतर संभाजी ब्रिगेड राजभवनावर कुदळ मोर्चा नेऊन शिवस्मारक करणार आहोत. अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळात, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे,प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, मुंबईचे अध्यक्ष सुहास राणे, संभाजी ब्रिगेडच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, दिनेश महाडिक, संदीप बारड, शंकर तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post