अहमदनगर पोस्टल सोसायटीचे कार्य उल्लेखनीय : वरिष्ठ डाक अधीक्षक बी नंदा

| अहमदनगर| दि. 02 सप्टेंबर | 2024 | अहमदनगर पोस्टल सोसायटीचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन अहमदनगर विभागाचे वरिष्ठ डाक अधीक्षक श्री बी नंदा यांनी केले अहमदनगर पोस्टल सोसायटीचा 104 वा वर्धापन दिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होती यावेळी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे विभागीय व्यवस्थापक श्री अमोल भूमकर व डाक अधीक्षक संदीप हदगल उपस्थित होते.

यावेळी बोलताना बी नंदा म्हणले की अहमदनगर पोस्टल डिव्हिजन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर या महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेच्या स्थापनेस 30 ऑगस्ट रोजी 104 वर्षे पूर्ण झाली असून संस्थेने 105 व्या वर्षात पदार्पण केले आहे संस्थेची शतकोपार परंपरा नवी पिढी सक्षमपणे सांभाळत आहे सोसायटीचे कार्य उल्लेखनीय असून यापुढेही सोसायटीचा नावलौकिक वाढविण्याचा प्रयत्न या संचालक मंडळांनी करावा अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली

 सोसायटीमार्फत मार्फत सभासदांच्या वारसास मदत गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सेवानिवृत्तांचा गुणगौरव याच बरोबर सभासदांना अल्प व्याजदराने 25 लाखापर्यंत शिक्षणासाठी व पाल्यांच्या करिता तसेच घर बांधणी घर खरेदी याकरिता कर्ज देते. कर्जाची वसुली पगारातून नियमित होत असल्याने संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने चालली असल्याची माहिती चेअरमन रामेश्वर ढाकणे यांनी दिली.

संस्थेची संचालक  प्रमोद कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रफुल कुमार काळे यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी संस्थेची संचालक सुनील कुलकर्णी निसार शेख महेश  तामटे किशोर नेमाने सलीम शेख शिवाजी कांबळे स्वप्न  चिल्वर अर्चना दहिंडे बळी जायभाय व्यवस्थापक नितीन वाघ सभासद सुनील भागवत सतीश येवले दीपक जसवानी गणेश केसकर अंबादास सुद्रिक शरद नवसुपे अरविंद वालझाडे विजय चाबुकस्वार संदीप मिसाळ सुखदेव पालवे, जय मडावी कवीश्वर ताकपेरे अविनाश आढाव सुनील जाधव देवेंद्र शिंदे अश्विनी फुलकर संचिता गाडे आदी सह मोठ्या संख्येने सभासद हजर होते

👉 क्लीक करा आणि...साप्ताहिक विजयमार्गचा अंक वाचा... 1

👉  क्लीक करा आणि...साप्ताहिक विजयमार्गचा अंक वाचा... 2

👉  क्लीक करा आणि...साप्ताहिक विजयमार्गचा अंक वाचा...3

Post a Comment

Previous Post Next Post