गुलालाच्या गोण्याखाली लपविलेले कोयता, तलवारी जप्त!

| अहमदनगर | दि.19 सप्टेंबर 2024 |श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाच्या गोण्यांखाली लपवून ठेवलेले घातक शस्त्रे जप्त करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. ही शस्त्रे ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनुचित प्रकार टळला आहे. अहमदनगर शहरासह उपनगरात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. 

💥 शेतकर्‍याचे घर फोडून मौल्यवाण वस्तुसह... 

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह पोलीस ठाण्यातील अधिकारी - अंमलदार उपनगर भागातील मिरवणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील काही गणेश मंडळांच्या आपसातील कलहामुळे गणेश मंडळांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. 

💥 मोटारसायकली चोरणारा अट्टल चोरटा ...

सायंकाळी सातेसात वाजण्याच्या सुमारास पोनि आनंद कोकरे यांना उपनगराचा राजा गणेश मित्र मंडळाचे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये असलेल्या गणेशमूर्तीच्या ट्रॅक्टरमध्ये गुलालाच्या गोण्याखालील तलवार व काही घातक शस्त्रे काहीतरी घातपात करण्याचे उद्देशाने गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी लपवून ठेवली आहे, अशी माहिती मिळाली. 

💥 केडगाव बायपासवर दहशत माजविणारे तिघे...

पोलीस निरीक्षक कोकरे हे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह सोनानगर चौकात पोहोचले. तेथे उपनगर राजा मित्र मंडळाचे गणेशमूर्ती ठेवलेल्या ट्रॉलीची पंचासमक्ष झडती घेतली असता, ट्रॉलीमध्ये एक लोखंडी कोयता, तीन लोखंडी पाईप, एक कटावनी व एक लोखंडी पाईपला सायकलचा गियर लावून केलेले घातक शस्त्रासह 

💥 कोतवाली पोलिसांची कारवाई ...

एक बेस बॉल खेळण्याचा दांडा सफेद गोणीमध्ये लपवून ठेवल्याचे मिळून आले. पोहेकॉ रणजित बारगजे यांनी उपनगरचा राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ दत्तात्रय जपे हे करत आहेत. 

💥 एमआयडीसी पोलिसांचा जुगार अड्डयावर...

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोनि आनंद कोकरे, सपोनि उज्वलसिंह राजपूत, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील,

सुनील शिरसाट, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, अहमद इनामदार, रणजित बारगजे, सुनील आंधळे, प्रदिप बडे, सुरज वाबळे, पो. हे.कॉ. बेरड, पोना वसीम पठाण, पो. कॉ. सुमीत गवळी, शिरीष तरटे, सतीश त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, बाळासाहेब भापसे, सतीश भंवर, राहुल म्हस्के, शफी शेख, संदिप गिर्‍हे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post