शेतकर्‍याचे घर फोडून मौल्यवाण वस्तुसह रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला

| अहमदनगर | दि.15 सप्टेंबर 2024 | नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात राहणार्‍या शेतकर्‍याचे घर रात्रीच्या वेळी फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेले १ तोळा ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण आणि १३ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि.१२) रात्री ९ ते शुक्रवारी (दि.१३) पहाटे ५.३० या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 पांढरी पुलावर आठा तासामध्ये तीन अपघात परंतु....

याबाबत अमोल दशरथ झरेकर (वय ३५, रा. कुमजाई वस्ती, घोसपुरी, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी झरेकर हे शेतकरी असून त्यांचा दुधाचा व्यवसाय आहे. गुरुवारी (दि.१२) रात्री ते व त्यांचे कुटुंबीय घरात झोपलेले असताना रात्री केंव्हातरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या किचन रूमचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले १ तोळा ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण आणि १३ हजारांची रोकड चोरून नेली. 

👉 दीपावली सणानिमीत्त तात्पुरते फटाके विक्री परवान्याबाबत आवाहन

पहाटे झोपेतून उठल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देत नगर तालुका पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (२), ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ.सचिन वनवे हे करीत आहेत.

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

चोरट्यांनी सध्या शहर व नगर तालुक्यात धुमाकुळ घातला आहे. तोफखाना, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीसह आता चोरट्यानी एमआयडीसी आणि नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हाद्दीमध्ये चोरट्यांनी आपला मोर्चा वळवला असल्याचे बोलले जात असून चोरट्यांना तसेच चोर्‍यांना तात्काळ आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने उपाय योजना कराव्यात तसेच रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी पुढे येवू लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post