एसटी कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!


| मुंबई | दि. 04 सप्टेंबर | 2024 |  एसटी कर्मचार्‍यांसोबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी कर्मचार्‍याची बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचार्‍यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या. एकंदरीत मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये संपावर तोडगा निघाला असून मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ करण्यात आली आहे.

आजच्या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ उपस्थित होते. याचबरोबर भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री एसटी कर्मचार्‍यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का? याकडे राज्याचं लक्ष होतं. अखेर एकनाथ शिंदे यांना याबाबत मोठं यश आलं आहे. एसटी कर्मचार्‍यांनी ५००० रुपयांची वेतनात वाढ करण्याची मागणी केली होती. पण सरकारने तब्बल ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post