पारनेरमध्ये आधार केंद्र सुरू करा : खा. नीलेश लंके

पारनेरमध्ये आधार केंद्र सुरू करा : खा. नीलेश लंके

आधार कार्ड कॅम्पचे आयोजन करण्याचीही मागणी
 
| अहमदनगर | दि.१४ सप्टेंबर २०२४ | पारनेर शहरात कायमस्वरूपी आधार कार्ड केंद्र सुरू करण्याबरोबरच १८ वर्षावरील नागरीकांचे आधार कार्ड काढण्यासाठी तात्काळ विशेष कॅम्पचे आयोजन करण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
 

जिल्हाधिकारी कार्यालयाकडें पाठविलेल्या पत्रात खा. लंके यांनी नमुद केले आहे की, १८ वषानवरील वयाच्या नागरीकांचे आधार कार्ड काढण्यासाठी तालुक्यात एकही आधार केंद्र नाही. त्यामुळे तालुक्यातील १८ वर्षावरील नागरीकांना आधार कार्ड काढण्यासाठी नगर येथे जावे लागते.


त्यासाठी पारनेर येथे विशेष कॅम्पचे आयोजन करून १८ वर्षावरील नागरीकांचे कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करू देण्याची मागणी लंके यांनी केली आहे. दरम्यान, पारनेर हे तालु३याचे ठिकाण असतानाही तिथे आधार केंद्राची सुविधा नाही. पारनेर येथे तात्काळ कायमस्वरूपी आधार केंद्र सुरू करण्यात येउन नागरीकांची गैरसोय दुर करावी अशी मागणीही खा. लंके यांनी केली आहे.
 

Post a Comment

Previous Post Next Post