मोटारसायकली चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद

| अहमदनगर | दि.12 सप्टेंबर 2024 |शहरासह परिसरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत आरोपीस तोफखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून चार लाख २० हजार रुपयांच्या आठ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. किशोर जयसिंग पठारे (वय ४० वर्षे, मु. पो. पिंपळगाव माळवी, ता. नगर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

👉 वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करा  

फिर्यादी सुयश गोविंद नगरे (रा. हंगा, ता. पारनेर जि.अहमदनगर) हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले असता, त्यांची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल चोरीस गेली होती. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत असतानाच, पोनि कोकरे यांना एक जण सोनानगर चौकात चोरीची मोटारसायकल विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळाली. 

👉...चोरट्यांकडून २९ दुचाक्या ताब्यात 

त्यानुसार पोनिआनंद कोकरे यांच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा लावला. त्यानंतर   काही वेळातच भिस्तबाग ते सोनानगर चौक जाणार्‍या रोड लगत असलेल्या काटवनाजवळ एक इसम विना क्रमांकाच्या शाईन मोटारसायकलवर आला. सदर इसमाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याच्या  ताब्यातील विना क्रमांकाची शाईन मोटारसायकलची चौकशी करुन कागदपत्राची विचारणा करता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. 

👉 एमआयडीसी पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा 

त्यानंतर नमुद इसमास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर शाईन मोटारसायकल  हि नवीन कलेटर ऑफिसजवळून चोरी केल्याची कबुली दिली. शहरातील विविध ठिकाणाहून चोरी   केलेल्या  भिस्तबाग चौक, वडगाव गुप्ता रोड येथे लपवून ठेवलेल्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.  

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग

Post a Comment

Previous Post Next Post